विद्यामंदिर….

माता शारदेचं अधिष्ठान….

शाळेची सुंदरता, शिस्त, तिचे उपक्रम, शिक्षकांची तळमळ व मेहनत, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचे सहकार्य यामुळेच गेल्या १० वर्षात भौतिक अडचणीवर मात करून यशाची उज्ज्वल परंपरा जोपासणारे विद्यालय म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई.

यशवंत शिक्षण संस्था, ‘वीरबाग’, सुरूरची दुसरी शाखा म्हणून १४ जून, १९६५ मध्ये आपल्या विद्यालयाची स्थापना झाली. अत्यल्प विद्यार्थी संख्येवर प्रा. नानजकर यांच्या वाडयात ‘वाई हायस्कूल, वाई’ या नावाने शाळा भरत होती. पुढे भोर संस्थानचे राजे रघुनाथराजे पंतसचिव यांच्या वाड्यात विद्यालय सुरू झाले. १९८६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. शरद पवार यांचे उपस्थितीत विद्यालयाचे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई’ असे नामकरण करण्यात आले.
सन २००१ मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांचे हस्ते व रोटरी क्लब, वाईच्या सहकार्यातून संगणक प्रशिक्षणाचे उ‌द्घाटन झाले व जिल्हयातील संगणक शिक्षण देणारे पहिले विद्यालय हा बहुमान विद्यालयास प्राप्त झाला. आज शाळेचे रूपांतर वाईतील एका नामांकित शाळेमध्ये झालेले आहे.