शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये झालेल्या विविध शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादित केले आहे. या शैक्षणिक वर्षात एकूण १८ व्यक्तिगत खेळ प्रकार व ४ सांघिक खेळ प्रकारामध्ये आपल्या विद्यालयातील एकूण ३६७ विद्यार्थ्यांनी २५४ मुले व ११३ मुली सहभाग घेतला.
सांघिक खेळ प्रकारामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन या सांघिक खेळ प्रकारामध्ये मुले व मुली यांचे एकूण ९ संघ सहभागी झाले. यापैकी कबड्डी या खेळ प्रकारामध्ये संस्था अंतर्गत सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यालयाने विजेतेपद मिळवले आहे. शासकीय तालुकास्तर क्रिकेट स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील मुलांचा संघ प्रथम क्रमांक मिळवून विजेते पद मिळवले व जिल्हास्तरावर निवड झाली.
या शैक्षणिक वर्षात ३ खेळाडू राष्ट्रीयस्तर, ७ खेळाडू राज्यस्तर, २० विभागस्तरावर, २८ खेडाळू जिल्हास्तरावर सहभागी झाले.

Recent Comments