भविष्यातील शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने गणित विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणित विषयातील सर्व संबोध संकल्पना स्पष्ट व्हाव्यात आणि त्यांचे आकलन होणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी व्हावी, तसेच सखोल अभ्यास करण्याची सवय लागावी यासाठी स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, गणित ऑलंपियाड, डॉक्टर होमी भाभा सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या गणित विषयाची परीक्षा इत्यादी परीक्षेत बसण्याची विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. या परीक्षेसाठी आवश्यक ते मार्गदर्शन विद्यालयामार्फत केले जाते. विद्यालयामध्ये २२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना कु. यादव समृद्धी मॅडम यांनी गणिताचार्य श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. विद्यालयामध्ये दिनांक १४ मार्च हा दिवस पाय दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री गणेश ससाणे सर यांनी पाय ही संकल्पना सर्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केली. तसेच श्री. कुमठेकर सर यांनी गणितातील शून्याचा शोध, तसेच चिन्हांचे संकेत बेरजेचे व गुणाकार यांचे नियम याविषयी मुलांना माहिती सांगितली. सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत श्री. ससाणे सर व श्री कुमठेकर सर यांचा सन्मान करण्यात आला आहे. विद्यालयात तारखेनुसार पाढे म्हणण्याचा सराव घेतला जातो यातून विद्यार्थ्यांचे पाढे पाठ होण्यासाठी मदत होत असते. गणित विषयातील अप्रगत विद्यार्थांना किमान आवश्यक भागाची तयारी करून घेतली जाते. विद्यालयात स्वतंत्र गणित प्रयोगशाळा आहे. सर्व गणित शिक्षक गणित अध्यापनात विविध उपलब्ध शैक्षणिक साधनाचा उपयोग

विज्ञान विभाग

विज्ञान हा जिज्ञासा निर्माण करणारा विषय आहे. जो ज्ञानाच्या शाखेचा विस्तार करतो. निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे भौतिक आणि नैसर्गिक जगाची रचना व वर्तन तपासतो. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीची रुजवणूक व्हावी यासाठी सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षांमध्ये विज्ञान विभागामार्फत बाह्य परीक्षा, व्यसन मुक्तीवर आधारित व्याख्याने, विज्ञान मेळावा, विज्ञान हस्तलिखित, विज्ञान प्रतिकृती, विज्ञान प्रदर्शन, क्षेत्रभेट असे विविध उपक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यालयात विज्ञान छंद मंडळामार्फत अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात आला विविध प्रयोगातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी संदेश देण्यात आला. तसेच व्यसनमुक्ती कार्यक्रमांतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्याख्याना द्वारे पटवून दिली व तंबाखूचे सेवन करणार नाही. तसेच व्यसनाधिनता वाढविणाऱ्या पदार्थांचे सेवन करणार नाही. याविषयी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून शपथ घेण्यात आली.