यशतीर्थ 2023/24
संगणक प्रयोगशाळेत ३५ संगणक असून नेट कनेक्टिव्हिटी व सर्व्हरसह सुसज्ज आहे. विद्यालयातील पाचवी ते आठवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना संगणकाच्या जगाची ओळख करून दिली जाते. विद्यार्थी अभ्यासक्रमाचे पालन करतात . विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजांसाठी संगणकाचा वापर करणेचे प्रशिक्षण दिले जाते. शैक्षणिक अध्यापनात शिकवल्या जाणाऱ्या संकल्पनांना बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अध्यापनात तंत्रज्ञानाची सांगड घालण्यासाठी शाळेत विविध विषय सुधारित आणि विस्तृत पद्धतीने समजावून सांगण्यासाठी डिजिटल लॅबचा वापर करतात.
संगणक प्रदर्शन – विद्यालयात दरवर्षीप्रमाणे संगणक प्रदर्शनाचे आयोजन केले गेले यामध्ये विद्यार्थ्यांनी उपक्रमांतर्गत बनवलेल्या विविध उत्कृष्ट स्लाईड शोचे प्रदर्शन दाखविले. हे प्रदर्शन वाई शहरातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी पाहण्याचा लाभ घेतला. सर्वांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या स्लाईड शोचे कौतुक केले.
संगणक शिक्षिका
निलम जगताप

Recent Comments