आपल्या विद्यालयात समाजशास्त्र विभाग चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक पर्यावरण विषयक आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवीत असतो. तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होण्यासाठी देशाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडी मध्ये ज्यांनी मोलाचे योगदान दिले अशा थोर व्यक्तींच्या कार्याचा आढावा, त्यांचे आदर्श, दिनविशेष आणि परिपाठाच्या माध्यमातून जयंती-पुण्यतिथीच्या दिवशी विद्यार्थ्यांना त्याची ओळख करून दिली जाते. विविध सहर्लीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळे, जागतिक वारसा स्थळे या ठिकाणी भेट देऊन त्या स्थळाचे महत्व पटवून दिले जाते व या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपली प्राचीन संस्कृती, देशाचा वैभवशाली इतिहास याबद्दल अस्मिता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. विविध व्याख्याने, सहलींचे आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची आवड वृद्धिंगत केली जाते.

ऐतिहासिक गड, किल्ले, डोंगर दऱ्यांची माहिती व्हावी विद्यार्थी धाडसी, साहसी, धैर्यवान व्हावेत या दृष्टिने सन २०२४-२५ या नव वर्षात यशवंत ट्रेक अॅड हेल्थ क्लब सुरू करण्यात आला. निसर्गाच्या सानिध्यात दऱ्या, डोंगर पार करताना व ऐतिहासिक माहिती मिळवताना विद्यार्थी, पालक यांच्या प्रतिक्रीयांनी या उपक्रमास प्रोत्साहन मिळत आहे.

शिवकालीन वस्तू व शस्त्रास्त्रे प्रदर्शन विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रास्त्रांची व दुर्मिळ वस्तूंची माहिती प्रत्यक्ष मिळावी याकरिता विद्यालयामध्ये ऐतिहासिक शस्रास्रांचे भव्यदिव्य प्रदर्शन शस्त्र संग्राहक श्री प्रसाद बनकर इतिहास व मोडी लिपी अभ्यासक यांच्या सहकार्याने भरविण्यात आले. या प्रर्दशनाचे उद्घाटन श्रीमती वैशाली जायगुडे (नायब तहसिलदार), श्री. साईनाथ वाळेकर (गटशिक्षणाधिकारी), व संस्थेचे ज्येष्ठ संचालक अॅड. श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. शस्त्र प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, बिचवा, वाघनखे, दांडपट्टे, अडकित्ते, दिवे व विविध हत्यारे तसेच दैनंदिन वापरातील जुन्या काळातील वस्तूंचे प्रदर्शनाने शिवकाळ जागा केला. वाई परिसरातील अनेक शाळाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यावेळी प्रदर्शन पहाण्यासाठी येवून उत्स्फूर्त पोवाडे गायन करुन विद्यार्थ्यांच्यात वीररस निर्माण केला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती येण्याकरीता क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात. एकूणच यशवंत शिक्षण संस्थेमध्ये इतिहासाच्या माध्यमातून विद्यार्थी अष्टपैलू, धाडसी, साहसी, चौकस व संशोधक वृत्तीचा बनविण्याचा यशस्वी प्रयत्न