दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कै. शंकरराव शेवडे यांच्या स्मरणार्थ कनिष्ठ व वरिष्ठ गटामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धाप्रमुख म्हणून श्री ठोंबरे एस. इ. यांनी काम पाहिले. विद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनी कु. डेरे वैष्णवी (वरिष्ठ गट प्रथम), कु. गायकवाड युगा कनिष्ठ गट प्रथम रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यालयात, सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळामार्फत शहरी व ग्रामीण विभागात तालुकास्तरीय विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले. या परीक्षांमध्ये तालुक्यातून एकूण ३०८ विद्यार्थी उपस्थित होते. हिंदी विभागामार्फत या परीक्षेचे यशस्वीपणे नियोजन करण्यात आले. शहरी विभागात विद्यालयातील १३ विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली. जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये २ विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला. शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्यालयात सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ मार्फत इयत्तेनुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये एकूण ४२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गतवर्षी या परीक्षेचा निकाल १००% असून कु. प्रणाली वासोळकर हिने सुलेखन कौशल्य परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला.

Recent Comments